Thursday, August 13, 2009

चला नदी वाचवूया

१५ AÉäaÉxOû ला अडाण नदीवर "चला नदी वाचवूया" कार्यक्रमाचे आयोजन

अडाण नदी वाचवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन

कारंजा (लाड): वाशीम जिल्ह्यातुन वाहत जाऊन यवतमाळ जिल्ह्यात पैनगंगेला जाऊन मिळणारी अडाण ही नदी अनेक कारणांनी संकटात आहे. पावसाचा लहरीपणा, धरणे, जंगलाचा नाश झाल्याने नदीत दिवसेंदिवस साचत चाललेला गाळ, प्रदुषण अशा अनेक कारणांनी अडान नदीचे अस्तीत्व धोक्यात आले आहे. या बदलांमुळे नदीवर आपल्या उपजीवीकेसाठी अवलंबून असणाऱ्या भोई व अन्य जनजातींचे जीवनही संकटात आहे. अशा परिस्थितीत तीला वाचवण्यादिशेने एक पाऊल म्हणून कारंजा येथील संवर्धन संस्था व धामणी येथील 'धामणी खडी रोहयो मजुर संघटने' तर्फे स्वातंत्र दिनाच्या दिवशी नदी काठाने वृक्षारोपनाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे.

कारंजा लाड ह्या वेगाने विकासाकडे मार्गक्रमण करत असलेल्या शहराची पाण्याची महत्वपूर्ण गरज आज अडाण नदीच्या पाण्यानेच भागवली जाते. तसेच नदी काठच्या हजारो शेतकरी, मासेमारांचे जीवन ह्या नदीवर अवलंबून आहे. गेल्या काही दशकात नदी काठचा झाडोरा, अजनाची अनेक जुणी झाडे नष्ट झाली आहे. नदी काठच्या झाडोऱ्यामुळे पाण्याचे तपमान योग्य राखल्या जाते, मातीची धुप होत नाही व जलचरांना भरपुर अन्न उपलब्ध होते. या दृष्टीने कारंजा शहरातील संवेदनशील नागरीकांनी ह्या वृक्षारोपनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहुन नदीच्या कारंजा शहरावरील उपकाराची अंशत: परतफेड करावी असे आव्हान आयोजकांनी केले आहे.

धामणी खडी मजूर संघटनेच्या सभासदांनी अडाण नदी खोऱ्यात गेल्या सहा महिण्याच्या कालावधीत अनेक जल संधारणाची कामे करुन नदी संरक्षणात एक प्रकारे मदतच केली आहे तसेच येणाऱ्या भविष्यात भारतातील पहिले "लोक अभय क्षेत्र" सुद्धा अडाण नदीवर स्थानीक लोक निर्माण करणार आहेत.

वृक्षारोपन सकाळी १० वाजता वडगाव धामणी मार्गावरील अडाण नदी पुलाजवळ संपन्न होणार आहे. ह्या कार्यक्रमाला पंचायत समीतीचे गट विकास अधीकारी श्री. पऱ्हाते व विस्तार अधीकारी श्री. जाधव, कि.न. महाविद्यालयाचे QûÉä. दिवाकर इंगोले व संवेदना संस्थेचे श्री. कौस्तुभ पांढरीपांडे उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रमाला मोठ्या संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अड. सुमंत बंडाळे, सचीव QûÉä. नीलेश हेडा, रोहयो संघटनेचे अध्यक्ष विलास मालटे, अशोक कडुसले, श्रीकृष्ण डोके, दिपक चक्रे, गुलाबराव बावने, श्रीराम पिंगाने, भागवत इंगळे, रफिक शेख, सुभाष भारसाकळे, ज्ञानेश्वर मालटे, रामदास दबडे, गजानन कानपुरे इत्यादी कार्यकर्त्यांनी केले आहे.


–––––––––––––––––––––––––––––––––––––

No comments: