Thursday, August 13, 2009

धामणीच्या मजुरांची उपेक्षा अजुनही सुरुच

धामणीच्या मजुरांची उपेक्षा अजुनही सुरुच

शेतकी विभागाकडुन गेल्या दिड महिण्यापासुन रोहयोची मजुरी न मिळाल्याने मजुरांमध्ये तीव्र असंतोष

कारंजा (लाड): धामणी खडी येथे अनेक विनंत्या अर्ज करुन शेवटी शेतकी विभागाने रोजगार हमी योजनेचे काम सुरु केले होते. सुमारे १८५ मजुरांनी २७ जुन २००९ ला सुमारे २ लाख रुपये किमतीचे शेतीच्या बांध बंदिस्तीचे काम पुर्ण पूर्ण केले. पण अजुनही त्यांना मजुरी न मिळाल्याने मजुरात प्रचंड असंतोष दाटला आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन विभागात पावसाने दडी मारली आहे परिणामत: मजुरीची कमतरता सुरु आहे त्यातच शेती विभागाने पगार देण्यास उशीर केल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.

रोजगार हमीच्या कायद्यानुसार मजुरांना मजुरी ही कामाचे मोजमाप केल्या नंतर जास्तीत जास्त पंधरा दिवसात मिळावयास हवी. जर तसे घडले नाही तर संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाईची तरतुद सुद्धा आहे. पण धामणीच्या मजुरांच्या बाबतीत सर्व नियम शेतकी विभागाने धाब्यावर बसवल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या ६ महिण्यांआधी धामणी (खडी) येथील मजुरांनी वाशीम जिल्ह्यासाठी एक आदर्श घालुन देत रोजगार हमी योजने अंतर्गत हक्काचा रोजगार मिळवला होता. ज्या वेळी संबंध वाशीम जिल्ह्यात केवळ १९८ मजुर कामाला होते त्या वेळी एकट्या धामणी गावातुन सुमारे ३०० मजुर निसर्गाला शाश्वत बनवण्याच्या प्रयत्नात होते. केवळ ४ महिण्याच्या कालावधीतच त्यांनी १७ वन तलावांचे काम पूर्ण करुन सुमारे ५ लाख रुपयांची मजुरी पदरात पाडुन घेतली होती हे विषेश.

त्यामुळे जिल्हाधीकाऱ्यांनी व जिल्हा परिषदेच्या विषेश कार्यकारी अधीकाऱ्यांनी मजुरी काढण्याचे आदेश देण्याची मागणी धामणी खडी रोजगार हमी योजना संघटनेने केली आहे.


 


–––––––––––––––––––––––––––––––––––––

No comments: