Tuesday, August 18, 2009

सरकारी कर्मचाऱ्यांच्या अज्ञान व दिरंगाई मुळे रोहयो मजूरांचा पोळा कोरडा जाणार

सरकारी कर्मचाऱ्यांच्या अज्ञान व दिरंगाई मुळे रोहयो मजूरांचा पोळा
कोरडा जाणार

धामणी: पावसाच्या दिरंगाई सोबतच आता वाशिम जिल्ह्यातील विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईने मजुर वर्ग त्रस्त झाला आहे. पावसामूळे माना टाकणाऱ्या शेती, मजुरीची कमतरता आणि मजुरी करुनही दिड दोन महिणे पगार न मिळत असल्याने रोहयो मजूर त्रस्त झाले आहेत.

धामणी खडी येथे अनेक विनंत्या अर्ज करुन शेवटी शेतकी विभागाने रोजगार हमी योजनेचे काम सुरु केले होते. सुमारे १८५ मजुरांनी २७ जुन २००९ ला सुमारे २.५ लाख रुपये किमतीचे शेतीच्या बांध बंदिस्तीचे काम पुर्ण पूर्ण केले. पण अजुनही त्यांना मजुरी न मिळाल्याने मजुरात प्रचंड असंतोष दाटला आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन विभागात पावसाने दडी मारली आहे परिणामत: मजुरीची कमतरता सुरु आहे त्यातच शेती विभागाने पगार देण्यास उशीर केल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.

रोजगार हमीच्या कायद्यानुसार मजुरांना मजुरी ही कामाचे मोजमाप केल्या नंतर जास्तीत जास्त पंधरा दिवसात मिळावयास हवी. जर तसे घडले नाही तर संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाईची तरतुद सुद्धा आहे. पण धामणीच्या मजुरांच्या बाबतीत सर्व नियम शेतकी विभागाने धाब्यावर बसवल्याचे चित्र दिसत आहे.

दिनांक १८ आगस्टला सुमारे ५० मजूर येथील शेती विभागात सदर दिरंगाईचा जाब विचारायला गेले. तालुका कृषी अधीकारी वाशिम ला बैठकीला गेले होते. कार्यालयातुन माहित पडले की, पोस्ट विभागाला न विचारता त्यांच्या नावे भरपूर उशीरा चेक काढण्यात आले. सदर घटनेबद्दल तालुका कृषी अधीकाऱ्यांना फोन वर विचारण्याचा प्रयत्न करतांना त्यांनी फोन उचलला नाही. ग्राम कृषी अधीकाऱ्यांनी मी वाशिमला आहे असे सांगून वेळ मारुन नेन्याचा प्रयत्न केला. जिल्ह्याधीकाऱ्यांना या बाबतीत विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या पी.ए. नी "साहेब तीन दिवस बोलू शकणार नाहीत, तुम्ही कृपया दिवशी फोन करा " असे छान उत्तर दिले.

शेवटी कृषी कार्यालयातील श्री. काळे आणि श्री. तायडे यांनी धावपळ करुन एकदाचा अडीच लाख रुपयांचा डी.डी. तयार केला आणि ताबडतोब मंगरुळ पोस्ट आफिसला पाठवला. परंतू मंगरुळपीर पोस्ट आफीस मध्ये फोन वर बोलने झाल्यानंतर पोळ्याच्या आधी मजूरांना मजूरी मिळेलच असे नाही असे सांगण्यात आले.

धामणी खडीत सद्या २८५ मजूर रक्ताचे पाणी करुन काम करतात. होळी असो की दिवाळी त्या मजूरांना आजवर वेळेवर रोहयोच्या कायद्यात सांगीतल्या प्रमाणे वेळेत मजूरी मिळाली नाही. या बाबतीत आजवर कोणत्याही सरकारी अधीकाऱ्यांवर कारवाई झाली नाही.


 

अडा

No comments: